Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:49 IST

1 / 10
सध्या जिकडेतिकडे 'धुरंधर'ची चर्चा सुरू आहे. 'धुरंधर'मधील कलाकारांसोबतच त्यातील भूमिकांविषयी जोरदार चर्चा होते आहे. रहमान डकैतनंतर 'धुरंधर'मध्ये दाखवलेले खनानी ब्रदर्स कोण? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
2 / 10
'धुरंधर'मध्ये अभिनेता अंकित सागरने जावेद खनानीची भूमिका साकरली आहे. तर मुशताक नायका हा अल्ताफ खनानीच्या भूमिकेत आहे.
3 / 10
'धुरंधर'मध्ये दाखवलेले खनानी ब्रदर्स हे पाकिस्तानमधील खरंखुऱ्या व्यक्तिरेखा आहे. पाकिस्तानातील ते मोठे व्यावसायिक होते.
4 / 10
खनानी ब्रदर्स हे 'खनानी अँड कालिया इंटरनॅशनल(KKI) ही संस्था चालवायचे. खोट्या नोटा छापून त्या भारतात पाठवायचा त्यांचा व्यवसाय होता.
5 / 10
या खोट्या नोटांद्वारे ते ISI, अल कायदा, लष्कर ए तौयबा, जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करायचे.
6 / 10
कुख्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा काळा पैसा मार्गस्थ लावण्याचं कामही खनानी ब्रदर्स करायचे.
7 / 10
खरंतर जावेद खनानी हा रहमान डकैतपेक्षाही खुंखार होता. अंडरवर्ल्डमध्ये डकैतपेक्षाही त्याची दहशत जास्त होती. भारतात नकली नोटांचा त्याने अक्षरश: पाऊस पाडला होता.
8 / 10
या नकली नोटा हुबेहुब भारतीय नोटांसारखा दिसायच्या. २००० च्या दशकात पाकिस्तानातून तब्बल १५००-२००० कोटी रुपये भारतात पाठवून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला गेला होता.
9 / 10
पण, नोटबंदीमुळे खनानी ब्रदर्सचे धाबे दणाणले. भारतात नोटबंदी झाल्यानंतर जावेद खनानीचं जगणं मुश्किल झालं होतं.
10 / 10
जावेद खनानीला त्याच्या कर्माची फळंही इथेच भोगावी लागली. नोटबंदीनंतर एका महिन्यातच जावेद खनानीचा एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन पडून संशयस्पदरित्या मृत्यू झाल्याची बातमी आली होती.
टॅग्स :धुरंधर सिनेमापाकिस्तान