धर्मेंद्र अन् प्रकाश कौर यांच्या मुलींना पाहिलंत का? ईशा-अहाना इतक्याच दिसतात सुंदर; करतात 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:50 IST
1 / 8हिंदी चित्रपटांतील आपल्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारे, बॉलिवूडचे 'ही मॅन' अशी ओळख मिळवणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी तब्बल 5 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. 2 / 8 धर्मेंद्र यांनी आजवर अनेक अजरामर सिनेमे बॉलिवूडला दिले.आपल्या फिल्मी करिअरबरोबरच धर्मेंद्र त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही नेहमीच चर्चेत राहिले.धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली. 3 / 8 प्रकाश कौर या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत. सनी देओल आणि बॉबी देओलसह धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना दोन मुलीही आहेत,ज्या लाईमलाईटपासून दूर राहतात.4 / 8 अजेता आणि विजेता अशी त्यांची नावे आहेत. अजेता ही धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची मोठी मुलगी असून ती अमेरिकेत मनोविज्ञान प्रोफेसर म्हणून काम पाहते. 5 / 8 अजेता तिचे पती किरण चौधरी यांच्यासह परदेशात स्थायिक झाली आहे.किरण चौधरी हे भारतीय वंशाचे अमेरिकन डेंटिस्ट आहेत. या कपलला दोन मुली आहेत.6 / 8 तर धर्मेंद्र यांची दुसरी लेक विजेता दिल्लीमध्ये पती विवेक यांच्यासोबत राहते. ते दिल्लीतील एक मोठे व्यवसायिक आहे. तर विजेता राजकमल होल्डिंग्ज अॅंड प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवते.7 / 8इतकंच नाहीतर धर्मेंद्र यांनी त्याची प्रोडक्शन कंपनी विजेता प्रोजक्शन लिमिटेड या कंपनीचं नाव लेक विजेताच्या नावावरून ठेवलं आहे.8 / 8 एका प्रसिद्ध कुटुबांतून असून सुद्धा त्यांनी आपल्या आईप्रमाणे फिल्मी जगापासून अंतर ठेवलं. अजेता-विजेता या दिसायला अगदी बहिणी ईशा आणि अहाना इतक्या सुंदर आहेत.