एका झटक्यात बदललं शेफाली शाहचं आयुष्य...! ठरली OTTवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 17:24 IST
1 / 9शेफाली शाह टीव्ही व फिल्मी दुनियेतील एक लोकप्रिय नाव आहे. पण आत्ताकुठे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर तिला खरं स्टारडम मिळत आहे.2 / 9होय, रंगीला, सत्या, मान्सून वेडिंग, रेस अगेन्स्ट टाईम यासारख्या सिनेमात शेफाली झळकली. पण ‘दिल्ली क्राईम’ या ओटीटीवर प्रदर्शित वेबसीरिजने जणू शेफालीचं नशीब पालटलं.3 / 9 आज शेफाली ओटीटीवरची सर्वात बिझी आणि सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे.4 / 9बॉलिवूडमध्ये शेफालीने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. देखील शेफालीला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. 5 / 9वन्स अगेन या नेटफ्लिक्सवरच्या सिनेमात शेफालीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.पाठोपाठ ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं तिचं आयुष्य एका झटक्यात बदललं. तिला खास ओळख मिळाली.6 / 9म्हणूनच, ओटीटीने मला नवे पंख दिलेत, मला एक नवी ओळख दिली, असे शेफाली म्हणते.7 / 9पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ती बोलली. ओटीटीवर कुणीही हिरो वा हिरोईन नसतो. प्रत्येक भूमिका दमदार असते. ओटीटीने मला इतक्या वर्षात जे मिळालं नव्हतं ते सर्व दिलं, असं ती म्हणाली.8 / 9दिल्ली क्राईम या वेबसीरिजमध्ये शेफालीने डीसीपी वर्तिका चतुर्वेदी ही व्यक्तिरेखा साकारली. तिची ही भूमिका तुफान गाजली. 9 / 9 सध्या शेफालीकडे कामाची कमतरता नाही. अनेक प्रोजेक्टवर तिचं काम सुरू आहे. अगदी शेफाली आज ओटीटीवरची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.