Join us
Daily Top 2Weekly Top 5

Deepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 20:24 IST

1 / 5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. अखेर ही प्रतीक्षा संपली. दीपवीरने आपल्या लग्नाचे फोटो अधिकृतपणे जाहिर केलेत. वधूच्या पोशाखातील दीपिका आणि वराच्या पोशाखातील रणवीर यांना पाहणे, चाहत्यांसाठी कुठल्या ट्रिटपेक्षा कमी नाही.
2 / 5
काल १४ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने कोंकणी पद्धतीने लग्न केले. यानंतर आज १५ तारखेला सिंधी पद्धतीने दोघांचा विवाह झाला. खरे तर कालपासून चाहते दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंच्या प्रतीक्षेत होते. पण दीपिका व रणवीरने लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर फोटो शेअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दोघांनीही हे फोटो शेअर केलेत.
3 / 5
लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. अर्थात याऊपरही काही फोटो लीक झाले होते. पण हे फोटो अस्पष्ट होते. कारण हे फोटो बºयाच दूर अंतरावरून टिपण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती.
4 / 5
चाहतेच नाहीत तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी अधीर झाल्या होत्या. स्मृती इराणींनी आपल्या सोशल अकाऊंटवर एक मजेशीर फोटो पोस्ट केला होता. यामध्ये एका पुरुषाचा सांगाडा बाकड्यावर बसलेला आहे. त्याखाली दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही खूप काळ वाट पाहता तेव्हा...असे कॅप्शन त्यांनी दिले होते.
5 / 5
आता प्रतीक्षा संपलीय. दीपिका व रणवीरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग