IN PICS : सिनेप्रेमींना आहे या चित्रपटांची प्रतीक्षा, एक एका सिनेमावर खर्च झालाय पाण्यासारखा पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:37 IST
1 / 10केजीएफ 2 हा पाण्यासारखा पैसा खर्च करून तयार करण्यात आलेला बिग बजेट सिनेमा बनून तयार आहे. कोरोना महामारीमुळे तो रखडला. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.2 / 10एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर सिनेमाकडे सर्वांच्या नजरा लागला आहे. कोट्यवधी रूपयांचे बजेट असलेला हा मल्टिस्टार सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.3 / 10शाहरूख खानच्या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. लवकरच शाहरूखचा ‘पठाण’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येतोय. हा एक बिग बजेट सिनेमा आहे.4 / 10ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ या बिग बजेट सिनेमाचीही जोरदार चर्चा आहे. शेकडो कोटींचा बजेट असलेला हा सिनेमाही एक बहुप्रतिक्षीत सिनेमा आहे.5 / 10 साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर ‘राधे श्याम’ या सिनेमावर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. हा बिग बजेट सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना बघता येणार आहे.6 / 10हृतिक रोशन व दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘फायटर’ हा बिग बजेट सिनेमाही येत्या काळात सिनेप्रेमी बघू शकणार आहेत.7 / 10आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. हा बिग बजेट सिनेमाही या वर्षी प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.8 / 10 दिवंगत जे जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला आणि कंगना राणौतची मुख्य भूमिका असलेला ‘थलायवी’ हा सुद्धा एक बिग बजेट सिनेमा आहे.9 / 10 निर्माता मधू मंटेना यांनी अलीकडे रामायणावर आधारित एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीये. 600 कोटींवर बजेट असलेला हा सिनेमाही बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या रांगेत आहे.10 / 10प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचीही घोषणा झाली आहे. यात दीपिका पादुकोण त्याच्यासोबत दिसणार आहे. हा सुद्धा एक बिग बजेट सिनेमा आहे.