'चाची ४२०'मधील तबूची छोटी मुलगी आठवतेय का? इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने आणलं कॅमेऱ्यासमोर, आता दिसते फारच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:02 IST
1 / 9'चाची ४२०' हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन सिनेमा. ११९७ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही तितकाच आवडीने पाहिला जातो. 2 / 9 या सिनेमाने कमल हसन, तबु, अमरिश पुरी, ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर भारती बनलेल्या छोट्या मुलीने तिच्या लाघवी अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 3 / 9'चाची ४२०'मधील ही चिमुकली आता बरीच मोठी झाली आहे. सिनेमात ती तबूची मुलगी दाखवली होती. आता इतक्या वर्षांनंतर या मायलेकींचं रियुनियन झालं आहे. 4 / 9तबू आणि तिची ऑनस्क्रीन लेक इक्कीस सिनेमाच्या प्रिमियरला एकत्र दिसल्या. यावेळी पापाराझींसमोर त्यांनी पोझही दिल्या. 5 / 9 'हिला ओळखलं का... हिची 'चाची ४२०'मध्ये माझी मुलगी होती', असं म्हणत तबूने पापाराझींनी तिची ओळख करून दिली. 6 / 9'चाची ४२०'मध्ये छोट्या भारतीची भूमिका साकारलेली अभिनेत्री आता बॉलिवूड स्टार आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री फातिमा शेख आहे. 7 / 9फातिमाने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. 'चाची ४२०'मध्ये ती फक्त ४ वर्षांची होती. 8 / 9तिने 'इश्क','वन टू का फोर','बडे दिलवाला' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. आमिर खानच्या दंगल सिनेमामुळे फातिमा प्रसिद्धीझोतात आली होती. 9 / 9'सॅम बहादुर', 'आप जैसा कोई', 'मेट्रो इन दिनो', 'टेबल नं २१', 'मेरे मेहबूब मेरे सनम' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.