By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:10 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला मारहाण करून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला.2 / 8ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून फ्लोरा सैनी आहे, जिने 'स्त्री'मध्ये एका चेटकीणीची भूमिका साकारली होती, जिचे एका निर्मात्यासोबत अपमानास्पद संबंध होते.3 / 8एक काळ असा होता जेव्हा फ्लोरा सैनी निर्माता गौरांग दोशीला डेट करत होती. अभिनेत्रीचे हे नाते फक्त १४ महिने टिकले.4 / 8अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या चेहऱ्यावर बुक्का मारला. त्यानंतर त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवरही ठोसा मारला.5 / 8अभिनेत्रीने सांगितले की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचा फोनही हिसकावून घेतला. त्याने तिला इंडस्ट्रीमध्ये काम सोडण्यासाठी दबावही आणला.6 / 8फ्लोराने सांगितले की तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला कोणाशीही बोलू देत नव्हता. त्याने तिच्या पोटात बुक्का मारला, ती कशीतरी तिथून पळून गेली.7 / 8अभिनेत्रीने सांगितले की त्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर ती तिच्या पालकांकडे गेली. या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिला बराच वेळ लागला.8 / 8काही काळापूर्वी फ्लोराने असेही सांगितले होते की ती पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे.