Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतासह विदेशातही आहेत 'या' 8 कलाकारांची घरं; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:00 IST

1 / 9
बॉलिवूड सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल, त्यांची महागडी घरं यांचं चाहत्यांना कायमच आकर्षण असतं. त्यामुळे अनेकदा चाहते या कलाकारांच्या घराबाहेर गर्दी करतात. परंतु, बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांची विदेशातही घरं आहेत. त्यामुळे विदेशात घरं असलेले कलाकार कोणते ते पाहुयात.
2 / 9
सलमान खान- सलमानचं दुबईमध्ये बुर्ज खलिफाजवळ द अँड्रेस डाउनटाउनमध्ये एक अपार्टमेंट आहे.
3 / 9
अमिताभ बच्चन - बिग बींची एकूण आठ आलिशान घरं आहेत. यापैकी पाच मुंबईत आहेत. व, इतर घर मुंबईबाहेर. तसंच पॅरिसमध्येही त्यांचं एक घर असून त्याची किंमत ३ कोटी रुपये आहे.
4 / 9
अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय बच्चन- ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक यांचं दुबईतील जुमेराह येथील गोल्फ इस्टेट येथे एक व्हिला आहे.
5 / 9
प्रियांका चोप्रा - देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणाऱ्या प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केलं आहे. सध्या प्रियांका अमेरिकेमध्येच स्थायिक आहे. प्रियांकाचं १४४ कोटींची एक हवेली आहे. तसंच लॉस एंजलिसमध्ये निक आणि तिने मोठं घरही घेतलं आहे.
6 / 9
अक्षय कुमार - बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याचं कॅनडातील टोरंटोमध्ये मोठा बंगला आहे. टोरंटोमध्ये त्याच्या नावावर एक टेकडी असल्याचं सांगण्यात येतं. या टेकडीवर काही अपार्टमेंट आणि बंगले त्याच्या नावावर आहेत. तसंच मॉरिशसमध्येही एका फेमस बीचवर त्याचा बंगला आहे.
7 / 9
शाहरुख खान- शाहरुख खानचं दुबईतील द पाम जुमेराह येथे लक्झरी हॉलिडे होम आहे. या घराची किंमत १७. ८४ कोटी रुपये आहे. या घरात एक खासगी बीचदेखील आहे. तसंच त्याचं लंडनमध्येही १८३ कोटींचं अपार्टमेंट आहे.
8 / 9
करीना कपूर खान- सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचं स्वित्झर्लंडमधील Gstaad येथे लक्झरी हॉलिडे होम आहे.
9 / 9
जॉन अब्राहम - जॉनचं अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील बेल एअर परिसरात आलिशान घर आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसलमान खानअमिताभ बच्चनप्रियंका चोप्राकरिना कपूरऐश्वर्या राय बच्चन