एड्ससंबंधी जागरूकता निर्माण करणारे बॉलिवूडचे 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:11 IST
1 / 7'नया जहर' या चित्रपटात 'अडल्ट फिल्मी' ड्रामा दाखवला असून साधारणत: १९९१ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एड्ससारख्या गंभीर आजारावर भाष्य करण्यात आले. 2 / 7सौम्या नावाच्या एच.आय.व्ही बाधित तरुणीच्या जीवनातील संघर्ष 'निदान' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. परफेक्ट फॅमिली ड्रामाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला. 3 / 7अभिनेत्री जुही चावला मुख्य भूमिकेत असलेला 'माय ब्रदर... निखिल' हा चित्रपट एकेकाळी वादात सापडला होता. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता संजय सुरी, जुही चावला तसेच पूरब कोहली मुख्य भूमिकेत समोर आले होते. 4 / 7अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या 'फिर मिलेंगे' या सिनेमामध्ये देखील एड्स या आजारासंबंधी प्रेक्षकांना पॉझिटिव्ह मसेज देण्यात आला आहे. 5 / 7२००७ मध्ये 'दस की कहानिया' हा बॉलिवूड सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट एड्स या विषयावर आधारित होता. 6 / 7'६८ पेजेस' या चित्रपटाचे कथानक एच आय व्ही एड्सबाधित एक काउंसलर आणि त्याचे पाच क्लाइंट्स यांच्यावर आधारलेली आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. 7 / 7२००९ मध्ये एड्स जागो 'AIDS JaaGO' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटमध्ये चार वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.