Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरोंपेक्षा जास्त मानधन घ्यायही 'ही' अभिनेत्री! दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अन् करिअरची लागली वाट, आता जगतेय 'असं' आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:10 IST

1 / 9
९० च्या दशकामध्ये आपल्या सुंदर अभिनयानं आणि बोल्डनेसमुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर.
2 / 9
बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ साली झाला. १९८१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलयुग’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.
3 / 9
दरम्यान, उर्मिला मातोंडकर छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही झळकली. बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर उर्मिलाने चित्रपट करणे बंद केले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने मुंबईच्या आर.डी. रुपारल कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी संपादन केली.
4 / 9
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'रंगीला' हा चित्रपट उर्मिला मातोंडकरच्या करिअरसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरला. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने एका डान्सरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात उर्मिला मातोंडकरसोबत आमिर खान होता.या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
5 / 9
एका रात्रीत उर्मिलाची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये झाली. करीअरमध्ये हे यश मिळवण्यासाठी उर्मिलाला राम गोपाल वर्मा यांची खूप मदत झाली. इतकंच नव्हे तर त्यावेळी उर्मिला पुरुष कलाकारांपेक्षा जास्त मानधन आकारत होती. राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर उर्मिलानं १३ सिनेमांत काम केलं. त्यात सत्या, जुदाई, चमत्कार, कुंवारा, जानम समजा करो, एक हसीना थी सारख्या सिनेमांचा समावेश होता.
6 / 9
उर्मिला आणि राम गोपाल वर्माच्या अफेअरच्या बातम्या तेव्हापासून येऊ लागल्या, जेव्हा त्याने माधुरी दीक्षितला त्याच्या एका चित्रपटातून काढून टाकले आणि उर्मिलाला साइन केले होते. राम गोपाल वर्माच्या प्रेमात पडणंही उर्मिलाला चांगलंच महागात पडलं.
7 / 9
एकीकडे राम गोपाल वर्मामुळे उर्मिलाची कारकीर्द खूप उंचीवर पोहोचली, तर दुसरीकडे तिच्या फिल्मी करिअरच्या घसरणीचे कारणही राम गोपाल वर्माच ठरले. २००८ मध्ये आलेल्या EMI या चित्रपटानंतर उर्मिलाला चित्रपट मिळणे बंद झालं. दरम्यान, झलक दिखला जाच्या दुसऱ्या सीझनमध्ये उर्मिला परीक्षकाच्या खुर्चीत दिसली होती.
8 / 9
इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर, उर्मिलानं ४२ व्या वर्षी ३ मार्च २०१६ रोजी काश्मीरमधील बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले.मात्र,त्यांचं हे नातं देखील टिकलं नाही. सध्या अभिनेत्री फारशी इंडस्ट्रीत सक्रिय नाही.
9 / 9
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, उर्मिलाने काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबईच्या जागेसाठी निवडणूक लढवली होती, परंतु तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यांतच उर्मिलाने पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिलाने १ डिसेंबर २०२० रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
टॅग्स :उर्मिला मातोंडकरबॉलिवूडसेलिब्रिटी