Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानसाठी वेडी होती 'ही' अभिनेत्री! 'दबंग' खानच्या पोस्टर्ससाठी उडवायची पॉकेटमनी, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 15:52 IST

1 / 7
भारतीय पहिली मिस युनिव्हर्स बनणारी अभिनेत्री, सौंदर्यवती म्हणजे सुश्मिता सेन.विशेष गोष्ट म्हणजे या स्पर्धेत ऐश्‍वर्या राय तिची स्पर्धक होती. पण मिस इंडिया पद पटकावलं ते सुश्मिताने. फिलीपिन्समधील मनिला येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुष्मिता प्राथमिक फेरीत तिसऱ्या क्रमांकावर होती. मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावणारी पहिली भारतीय महिला त्यानंतर सुश्मिताने मिस युनिव्हर्स झाली. तिचा विजय हा भारतासाठी अफाट अभिमानाचा क्षण होता.
2 / 7
१९९७ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुश्मिताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या यशाची चव चाखली ती ‘सिर्फ तुम’ या चित्रपटात. ‘दिलबर दिलबर’ या गाण्यातील सुश्मिताचे नृत्य प्रेक्षकांना आवडले.
3 / 7
त्यानंतर आला डेव्हीड धवन यांचा ’बीबी नं. 1’ यातील बीबी नं. 2 चा सुश्मिता रोल गाजला. हा चित्रपट सुपरहिट झाला. हा सुश्मिताचा सुपरहिट झालेला पहिला सिनेमा. या चित्रपटाकरिता तिला सहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअरदेखील मिळाले.
4 / 7
सुष्मिता सेनचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने ही अभिनेत्री लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. परंतु, तुम्हाला माहितीये का? सुष्मिता सलमानची मोठी चाहती आहे.
5 / 7
किशोरवयापासूनच सुष्मिताचं सलमानवर क्रश होतं. एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितले की, 'मला जो काही पॉकेटमनी मिळायचा त्यातून मी सलमान खानचे पोस्टर्स खरेदी करायचे. त्या दिवसांत 'मैंने प्यार किया' रिलीज झाला होता, तेव्हा माझ्याकडे त्या चित्रपटातील कबुतराचा फोटोही होता कारण तो सलमान खानच्या चित्रपटाचा होता.'
6 / 7
सुष्मिता सेन पुढे म्हणाली की, 'जेव्हा सलमान आणि माझी मैत्री झाली, तेव्हा त्यानं मला माझा आवडता चित्रपट कोणता आहे असं विचारलं होतं. तर मी 'मैंने प्यार किया' असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर सलमान लगेच डेव्हिड धवनकडे गेला आणि म्हणाला की, मला सुष्मिता सेनसोबत 'मैने प्यार क्यो किया' हा चित्रपट करायचा आहे'.
7 / 7
सुष्मिताने १९९९ मध्ये 'बीवी नंबर १' या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. सुष्मिताने सांगितले की, ती किशोरवयापासूनच सलमानची मोठी चाहती होती. ' मैने प्यार किया ' रिलीज झाल्यानंतर तिची सलमानबद्दलची आवड आणखी वाढली.
टॅग्स :सुश्मिता सेनसलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटी