Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी काळी 'या' अभिनेत्यावर जीवापाड प्रेम करत होती सोनाली बेंद्रे, पण 'या' कारणाने होऊ शकले नाही एक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:12 IST

1 / 10
बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स, लग्ने आणि घटस्फोट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आता तर लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकारांच्या अफेअर्सची चर्चा पुन्हा झालेली बघायला मिळाली. त्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचंही नाव होतं. सोनाली ही आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
2 / 10
सोनालीला कॅन्सर झाला होता तेव्हाही तिचे चाहते तिच्यासोबत होते. सोनालीबाबत अशी एक चर्चा तेव्हा ऐकायला मिळत होती की, ती तिच्यासोबत अनेक सिनेमात दिसलेल्या एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. पण तिने कधी सांगितलं नाही.
3 / 10
सोनाली ज्या अभिनेत्याच्या प्रेमात होती आणि ज्याच्यासोबत तिची लग्न करण्याची इच्छा होती तो दुसरा तिसरा कुणी नाही तर सुनील शेट्टी होता. आपल्या धमाकेदार अॅक्शनने आणि आपल्या खास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या सुनील शेट्टी आणि सोनालीने अनेक सिनेमात एकत्र काम केलं.
4 / 10
सुनील शेट्टी आणि सोनालीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्याही पसंतीस पडली होती. सुनील विवाहित असूनही अफेअरमुळे चर्चेत होता. असे म्हणतात त्याच्याच प्रेमात पडली होती अनेकांच्या मनावर राज्य करणारी सोनाली बेंद्रे. इतकेच नाही तर सुनीलच्या मनातही तिच्याबाबत ओढ होती.
5 / 10
९० च्या दशकामध्ये सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांची जोडी सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक होती. सुनीलचा अॅक्शन अंदाज आणि सोनालीच्या अदांनी प्रेक्षक भारावून जायचे. दोघांनी टक्कर (१९९५), सपूत (१९९६), भाई आणि कहर (१९९७) सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
6 / 10
आश्चर्याची बाब म्हणजे सुनील विवाहित असूनदेखील त्याचे सोनाली बेंद्रेवर प्रेम जडले होते. अनके सिनेमात एकत्र काम केल्यामुळे सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांनी बराच काळ एकत्र घालवला. यादरम्यान सोनाली आणि सुनील जवळ आले होते अशी चर्चा होती.
7 / 10
पण सिनेमाच्या कथानकात घडतं त्याप्रमाणे सुनील शेट्टी सोनाली बेंद्रेसमोर कधीही आपले प्रेम व्यक्त करू शकला नाही. कारण तो अगोदरच विवाहित होता आणि त्याला आपल्या पत्नीला धोका द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे दोघेही कधीही एक होऊ शकले नाहीत. महत्वाची म्हणजे दोघांनी कधीही त्यांचं हे नातं जगासमोर येऊ दिलं नाही.
8 / 10
आता दोघेही आपापल्या जीवनात आनंद आहे. बरीच वर्ष सिनेमात काम केल्यावर सोनालीने २००२ मध्ये गोल्डी बहलसोबत लग्न केलं. गोल्डी एक फेमस फिल्ममेकर आहे. ज्याने अंगारे, बस इतना सा ख्वाब है आणि लंडन, पॅरिस न्यूयॉर्क हे चित्रपट डायरेक्ट केले आहेत.
9 / 10
10 / 10
तर दुसरीकडे सुनील शेट्टी एक सक्सेसफुल अ‍ॅक्टर आहे आणि त्याचबरोबर त्याचे बिजनेसवर देखील तितकेच लक्ष असते. प्रॉडक्शनसोबत तो हॉटेल व्यवसायात बिझी आहे.
टॅग्स :सोनाली बेंद्रेसुनील शेट्टीइंटरेस्टींग फॅक्ट्स