Join us
Daily Top 2Weekly Top 5

घारे डोळे अन् तीच नजाकत, डिट्टो ऐश्वर्याची कॉपी! कुठे गायब झाली सलमानची 'ही' नायिका? आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:53 IST

1 / 7
अभिनेता सलमान खानने आजवर अनेक अभिनेत्रींना लॉन्च केलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे स्नेहा उल्लाल.
2 / 7
चित्रपटसृष्टीत आपल्या छोट्या कारकिर्दीतही प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या अभिनेत्री स्नेहा उल्लाल ऐश्वर्या रायप्रमाणे दिसत असल्याने तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती.
3 / 7
स्नेना उलाल हिला बॉलिवूड एन्ट्रीनंतर तिच्या लूकची प्रचंड चर्चा झाली होती.
4 / 7
स्नेहाने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. सलमान खानसोबत 'लकी-नो टाइम फॉर लव्ह' सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकली.
5 / 7
स्नेहाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. मात्र, तिचा लूक ऐश्वर्या रायसारखा असल्याने तिने अनेकांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं.
6 / 7
२०१५ मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात ती शेवटची दिसली. त्यानंतर अचानक स्नेहा इंडस्ट्रीपासून दुरावली.
7 / 7
या दरम्यानच्या काळात स्नेहा एका गंभीर आजाराशी झुंज देत होती तिला ऑटोइम्यून डिसऑर्डर हा आजार झाला होता.सध्या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. इन्स्टाग्रामवर आपले स्टायलिश फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते.
टॅग्स :बॉलिवूडसलमान खानऐश्वर्या राय बच्चनसेलिब्रिटी