Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आलिशान घर अन्...; घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या मौनी रॉयची नेटवर्थ माहितीये का? एका चित्रपटासाठी घेते 'इतकी' फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:53 IST

1 / 7
अभिनयाच्या झगमगाटाच्या या विश्वात कलाकारांची नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने त्यांच्या नात्यात काही अनपेक्षित वळणं येतात. काही नाती तर अगदी टोकाला जातात.
2 / 7
वाद, गैरसमजुती,फसवणूक आणि विवाहबाह्य प्रेमप्रकरणं अशा बऱ्याच कारणांनी आजवर अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. सध्या मनोरंजन विश्वात अशाच एक लोकप्रिय अभिनेत्रीच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
3 / 7
लग्नाच्या चार वर्षांनी अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.
4 / 7
मौनीने आतापर्यंत अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. मौनी रॉयने तिच्या सौंदर्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु, सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
5 / 7
मौनी रॉयने तिच्या प्रत्येक कामातून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, मौनी एका चित्रपटासाठी किती मानधन घेते आणि तिची एकूण संपत्ती किती आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
6 / 7
मिडिया रिपोर्टनुसार, मौनी रॉयचं मुंबईत एक आलिशान घर आहे. शिवाय एका चित्रपटासाठी सुमारे १ कोटी रुपये आणि एका टीव्ही एपिसोडसाठी लाखो रुपये इतकं मानधन घेते.
7 / 7
शिवाय मौनी एका म्युझिक व्हिडिओसाठी ४० लाख ते १ कोटी रुपये फी आकारते. टाइम्स ऑफ इंडियानुसार, मौनी रॉयची एकूण संपत्ती ४० ते ५० कोटी रुपये आहे.
टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूडसेलिब्रिटी