1 / 8 ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जूही_चावला आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2 / 8 जूहीने तिच्या सौंदर्याच्या आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. जूही त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची. 3 / 8 १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीच्या काळात ती सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणार्या हिंदी चित्रपट अभिनेत्रींपैकी एक होती.जुहीने ‘सल्तनत’ (१९८६) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. यानंतर १९८७ मध्ये जुहीने कन्नड सिनेमा प्रेमलोका केला, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि जुहीचे खूप कौतुक झाले.4 / 8मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती ‘कयामत से कयामत तक’ (१९८८) या चित्रपटातून. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात आमिर-जुहीची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. चॉकलेट बॉय आमिर आणि गोड चेहऱ्याच्या जुहीने कमाल केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. या चित्रपटासाठी जुहीला फिल्मफेअर अवॉर्डही मिळालं. पण हे यश पुरेसं नव्हतं कारण तिच्या समोर माधुरी नावाचं एक मोठं आव्हान उभं राहणार होतं. कारण त्याच वर्षी माधुरीचा तेजाब आणि एक दो, तीन हे गाणं सुपरहिट झालं होतं.5 / 8 १९९२ साली आलेल्या ‘बोल राधा बोल’ या चित्रपटाने मात्र जुहीला मदतीचा हात दिला आणि त्यानंतर ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘लुटेरे’, ‘हम है राही प्यार के’, ‘आईना’, ‘डर’ असे एकामागून एक सुपरहिट चित्रपट देत तिने माधुरीसमोर कडवं आव्हान निर्माण केलं.6 / 8 जुही चावलाने ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून या चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट विश्वात तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. जुहीला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 7 / 8 ९० च्या काळात सोशल मीडिया नसल्यानं कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला तितकी माहिती नसायची. असं म्हटलं जातं की,लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला हिनंसुद्धा तिच्या लग्नाबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं. अभिनय क्षेत्रातील करिअर संपण्याच्या भीतीमुळे तिने याबद्दल कुठेही सांगितलं नाही. असं जुहीने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 8 / 8