By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:39 IST
1 / 8भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भूमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 2 / 8नुकतंच भूमीने पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 3 / 8भूमीने पैठणी साडी नेसत त्यावर गुलाबी डिझायनर ब्लाऊज घातल्याचं दिसतं आहे. पैठणीमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. 4 / 8तिच्या ज्वेलरीने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. गळ्यात तिने चोकर आणि एक मोहनमाळ घातली आहे. तर कानात छान कानातले घातले आहेत. 5 / 8बन बांधत भूमीने खास हेअरस्टाइल केल्याचं दिसत आहे. 6 / 8कपाळावर चंद्रकोर लावत भूमीने तिचा लूक पूर्ण केला आहे. अगदी साध्या मेकअपमध्येही भूमीचं सौंदर्य उठून दिसत आहे. 7 / 8भूमीचा हा मराठमोळा लूक पाहून चाहतेही खूश झाले आहेत. एका इव्हेंटसाठी तिने हा खास लूक केला होता.8 / 8 भूमीच्या या मराठमोळा लूक आणि खास अंदाजापुढे मराठी अभिनेत्रीही फिक्या पडतील.