Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पहला नशा पहला खुमार...'मधली आमिर खानची हिरोईन आठवते? प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली, आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:10 IST

1 / 9
९०च्या दशकात लोकप्रिय असणारी अभिनेत्री,जो जिता वही सिकंदर' या चित्रपटात आमिर खानसोबत झळकून नावारुपाला आलेलं नाव म्हणजे आयेशा जुल्का.या चित्रपटानंतर 'पहला नशा गर्ल' या नावाने ती ओळखली जाऊ लागली.
2 / 9
आयेशा जुल्काचा जन्म २८ जुलै १९७२ रोजी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे झाला. तिचे वडील इंदर कुमार जुल्का हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर तर आई स्नेह जुल्का या फॅशन डिझायनर होत्या.
3 / 9
घरात एअरफोर्सचे वातावरण असतांना परंतु आयशाला मात्र आकाशाचे नाही, तर बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेचं आकर्षण होतं.
4 / 9
आयशाची अभिनयाची सुरुवात १९८३ मध्ये 'कैसे कैसे लोग' या चित्रपटात बालकलाकार म्हणून झाली होती. त्यावेळी आयशा ११ वर्षांची होती. याशिवाय आयशाने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.
5 / 9
आयेशाला अभिनेत्री म्हणून सलमान खानच्या ‘कुर्बान’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, परंतु आयशाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे खूप कौतुक झाले.
6 / 9
यानंतर अक्षय कुमारसोबत 'खिलाडी' आणि आमिर खानसोबत 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटांनी तिला इंडस्ट्रीत नवी ओळख मिळवून दिली. ९० च्या दशकात आयेशाने हिंदी, बंगाली, कन्नड आणि तेलगूसह विविध भाषांमधील ६० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.
7 / 9
दरम्यान,आयशाने २००३ मध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक समीर वशीशी लग्न केले.त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावली.त्यानंतर तिने आयेशा आणि समीर यांनी मुल होवू न देण्याचा निर्णय घेतला होता.
8 / 9
पण लग्न झाल्यानंतर त्यांनी गुजरातमधील २ गावे दत्तक घेवून, त्या गावातील १६० मुलांच्या सकस जेवणाचा व शिक्षणाचा खर्च उचलला. त्या मुलांना मुंबईत आणून संगोपन करणे शक्य नसल्यानं, हे दांम्पत्य गावात जावून त्यांच्यासोबत वेळ घालवते.
9 / 9
पण लग्न झाल्यानंतर त्यांनी गुजरातमधील २ गावे दत्तक घेवून, त्या गावातील १६० मुलांच्या सकस जेवणाचा व शिक्षणाचा खर्च उचलला. त्या मुलांना मुंबईत आणून संगोपन करणे शक्य नसल्यानं, हे दांम्पत्य गावात जावून त्यांच्यासोबत वेळ घालवते.
टॅग्स :आयशा जुल्काबॉलिवूडसेलिब्रिटी