Join us

अक्षय कुमारसोबत झळकलेला 'हा' अभिनेता करतोय वॉचमनची नोकरी! बसच्या तिकिटासाठीही नाहियेत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:21 IST

1 / 7
इथे काही जण रातोरात प्रसिद्धी मिळते तर काहींनी वर्षानुवर्ष मेहनत करुनही संघर्ष करावा लागतो. असाच एक अभिनेता ज्याने एकेकाळी अक्षय कुमार, धर्मेंद्र आणि ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती पण आज तो पोटाची खळगी भरण्यासाठी वॉचमेनची नोकरी करतो आहे.
2 / 7
या नायकाने एकेकाळी अनेक उत्तम चित्रपट केले होते पण आज त्याच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. हा अभिनेता म्हणजे सावी सिद्धू आहे.
3 / 7
अभिनेता सावी सिद्धूचा जन्म लखनऊमध्ये झाला. मॉडेलिंगमध्ये स्वप्न असलेल्या या अभिनेत्याने करिअरसाठी चंदीगढची वाट धरली. पण, नशिबाने तो अभिनयाच्या क्षेत्रात आला.
4 / 7
या अभिनेत्याने १९९५ मध्ये 'ताकत' या चित्रपटातून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली जिथे अनुराग कश्यपचे नजर त्याच्यावर पडली. नंतर, अनुराग कश्यप त्यांचे लोकप्रिय चित्रपट 'ब्लॅक फ्रायडे' (२००७) आणि 'गुलाल' (२००९) मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत तो दिसला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केलं.
5 / 7
त्यानंतर सावी साध्वीने 'पटियाला हाऊस' (२०११), 'डे डी' (२०१३), 'बेवकूफियां' (२०१४) आणि दाक्षिणात्य चित्रपट 'आरंभम' सारख्या चित्रपटांमध्ये दहशतवाद्याची भूमिका साकारून अभिनय केला. परंतु, आता या अभिनेत्यावर उदरनिर्वाहासाठी सुरक्षारक्षकाचं काम करण्याची वेळ आली आहे.
6 / 7
त्यानंतर सावी साध्वीने 'पटियाला हाऊस' (२०११), 'डे डी' (२०१३), 'बेवकूफियां' (२०१४) आणि दाक्षिणात्य चित्रपट 'आरंभम' सारख्या चित्रपटांमध्ये दहशतवाद्याची भूमिका साकारून अभिनय केला. परंतु, आता या अभिनेत्यावर उदरनिर्वाहासाठी सुरक्षारक्षकाचं काम करण्याची वेळ आली आहे.
7 / 7
तो लोखंडवाला येथील अंधेरी पश्चिम येथील एका इमारतीत वॉचमन म्हणून काम करताना दिसला. त्यावेळी माध्यमांनी अभिनेत्यासोबत संवाद साधल्यानंतर त्याने मनातील दु:ख व्यक्त केलं. आता कुटुंबात कोणीही नाही आणि आता तो एकटाच राहतो. सध्याच्या घडीला अभिनेत्याची परिस्थिती फार वाईट आहे. एखाद्या दिग्दर्शकाला भेटायला जाण्यासाठी बसच्या तिकिटाचे पैसेही त्याच्याकडे नाही.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी