प्रेम चोप्रा यांचा जावई आहे 'हा' बॉलिवूडचा चॉकलेट हिरो! लग्नाआधी सासऱ्यांच्या भीतीने उडालेला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:26 IST
1 / 9 चेहऱ्यावर विकृत हास्य आणि अधूनमधून डोळे वटारूण पाहण्याची सवय , जिभेवर लालसा असणारा चित्रपटातील खलनायक आठवला की एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो.2 / 9 बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे खूप कमी खलनायक आहेत, ज्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आज ही काही खलनायक पाहिले की चाहत्यांना धडकी भरते. या खलनायकांपैकीच एक असलेले अभिनेते म्हणजे प्रेम चोप्रा. 3 / 9प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, त्यांनी साकारलेले खलनायक चांगलेच गाजले.प्रेम चोप्रा यांनी खलनायकांची भूमिका इतक्या गंभीरतेने साकारली की त्यांना पाहून पुरूष त्यांच्या बायकांना लपवून ठेवत असत.4 / 9 १९६० साली प्रदर्शित झालेला हम हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट. मात्र, प्रेम चोप्रा यांना पहिलं यश ‘वह कौन थी ‘ सिनेमाने दिलं. त्यानंतर त्यांच्यासाठी अनेक दिग्दर्शकांची दारं खुली झाली. 5 / 9 मात्र, तुम्हाला माहितीये का प्रेम चोप्रा यांचा जावई देखील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शरमन जोशी आहे.6 / 9 प्रेम चोप्रा यांना तीन मुली असून यापैकी एकीने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे. पुनिता, रतिका आणि प्रेरणा अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. यापैकी प्रेरणाने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे.7 / 9 प्रेम चोप्रा यांना तीन मुली असून यापैकी एकीने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे. पुनिता, रतिका आणि प्रेरणा अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. यापैकी प्रेरणाने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे.8 / 9 शर्मन आणि प्रेरणा यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 9 / 9 १५ जून २००० मध्ये या दोघांनी कुटुंबाच्या संमतीने मुंबईत लग्नगाठ बांधली. शर्मन आणि प्रेरणाला एक मुलगी आणि दोन जुळी मुलं आहेत.