कोण होती संजू बाबाची पहिली पत्नी? वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:34 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. 2 / 8संजय दत्तच्या डेटिंग लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. माधुरीसोबत तर त्याचं लग्नही झालं असं असतं मात्र १९९३ च्या बॉम्बस्फोटात खटल्यात संजय दत्त अडकला आणि त्यांचं नातं तुटलं.3 / 8या अभिनेत्याने तीन लग्न केली, मान्यता दत्त ही संजयची तिसरी पत्नी आहे. तर या अभिनेत्याने मॉडेल रिया पिल्लईसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. मात्र, या नात्यात दुरावा आल्याने लग्नाच्या सात वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. 4 / 8परंतु, तुम्हाला माहिती आहे का संजय दत्तची पहिली पत्नी कोण होती? संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. 5 / 8साल १९८० मध्ये अभिनेते देव आनंद त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्याचदरम्यान, त्यांची भेट ऋचा शर्मासोबत झाली. त्यावेळी तिने देवानंद यांच्यासमोर चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.6 / 8त्यानंतर देव आनंद यांनी रिचाला 'हम नौजवान'साठी साइन केलं होतं. इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच ती प्रचंड चर्चेत आली होती. मग तिने अनुभव इन्साफ की आवाज या चित्रपटांमध्ये देखील झळकली. त्याबरोबर सडक छाप या चित्रपटांमध्येही तिने काम केलं. 7 / 8याचदरम्यान, रिचा आणि संजय दत्त यांची भेट झाली होती आणि त्यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. अखेर १९८७ मध्ये या दोघांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केलं होतं. मात्र नियतीच्या मनात वेगळच काही तरी होतं. 8 / 8लग्नाच्या वर्षभरातच रिचा शर्माने मुलगी त्रिशलाला जन्म दिला. मात्र, वयाच्या ३२ व्या वर्षी १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरमुळे अभिनेत्रीचं निधन झालं.