रेड लाईट एरियात गेलं बालपण, उपाशी राहून काढले दिवस; दिलीप कुमार यांनी संधी दिली अन् बनला बॉलिवूड सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:43 IST
1 / 92 / 9कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्तानातील काबूल येथे झाला. सावत्र बापाच्या छायेत अत्यंत गरीबीमध्ये मुंबईच्या कामठीपुरा परिसरात त्यांचं बालपण गेलं.3 / 9 अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. कादर खान आणि कॉलेजवयात संवाद लेखक म्हणून काम करायला सुरुवात केली. आयुष्याच्या हाल अपेष्टांनी या मुलाला जीवनाचं सार कळलं होतं.4 / 9 'ताश के पत्ते' नावाच्या नाटकात त्यांच्या अभिनयाच्या प्रतिभेने विनोदी कलाकार आगा यांचे लक्ष वेधून घेतले. आगा यांनी कादर खान यांची शिफारस दिग्गज दिलीप कुमार यांच्याकडे केली. त्यांचा अभिनय पाहिल्यानंतर दिलीपकुमार इतके प्रभावित झाले की त्यांनी कादरखान यांना त्यांच्या आगामी चित्रपट 'सगीना' आणि 'बैराग' मध्ये झळकण्याची पहिली संधी दिली. 5 / 9 कादर खान यांचा अभिनय प्रवास फार मोठा आहे. आपल्या सिने कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 'किशन कन्हैय्या',' हम', 'घर परिवार' ,'बोल राधा बोल', 'आंखें ',' तकदीरवाला', 'राजा बाबू ',' खुद्दार', 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी ' अशा विनोदी चित्रपटांसाठी ते आजही ओळखले जातात.6 / 9 आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणारा एक उत्तम अभिनेता म्हणून कादर खान यांना ओळखलं जातं.7 / 9 इंडस्ट्रीत कादर खान अमिताभ बच्चन यांचे खूप चांगला मित्र होते आणि दोघांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध होते. बिग बीं साठी 'मिस्टर नटवरलाल', 'खून पसीना', 'दो और दो पांच', 'नमक हलाल', 'सत्ते पे सत्ता', 'इंकलाब', 'गिराफ्तार', 'हम' आणि 'अग्निपथ' असे गाजलेले चित्रपट त्यांनी लिहिले. 8 / 9 कादर खान यांनी हाजरा खान यांच्याशी विवाह केला होता.त्यांना अब्दुल कुद्दुस, सरफराज खान आणि शाहनवाझ खान नावाची तीन मुले आहेत.9 / 9वृध्दापकाळात उपचार सुरु असतांना ३१ डिसेंबर २०१८ ला या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.