1 / 8अभिनेत्री बॉबी डार्लिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. आईच्या मृत्यूबद्दल सांगत बॉबी डार्लिंग ढसाढसा रडली. 2 / 8सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत बॉबी आईबद्दल बोलताना रडू लागली. 'मला माफ कर आई, मी काय करू शकते? कोणीही समजू शकलं नाही. तूही समजू शकली नाहीस. तू मला सोडून वर गेलीस. मी इथेच राहिली. मी संपूर्ण जगाला तोंड देत आहे.' 3 / 8'मी एकटीच लढत आहे. मी काय करू? देवाने मला असं का बनवलं? ही माझी चूक नाही. मला खूप दुःख झालं आहे. मला वाटतं की, मी माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे.'4 / 8'मी माझ्या आईचे दागिने चोरले आणि घरातून पळून गेले. मी ते चांदणी चौकात विकले. मला दागिने कसे विकायचे हे माहित नव्हतं. ते माझ्या आईच्या लग्नातले दागिने होते. मी ते विकले. मला ३० हजार रुपये मिळाले.'5 / 8'मी परदेशातून परत आल्यावर बाबांनी मला सांगितलं होतं की, तुझा नाश होईल असं आई म्हणाली. पप्पांनी तिला मला शिव्या देऊ नको असं सांगितलं होतं. पण माझ्या आईच्या तोंडून माझा सत्यानाश होईल असं निघालं आणि तेच झालं.'6 / 8'मी हाँगकाँगला गेली. मी तिथून माझ्या आईला फोन करून सांगितलं की आई मी ठीक आहे. मला तुझी खूप आठवण येते. मला तुझ्या जेवणाची खूप आठवण येत आहे.'7 / 8'आई दुःखात होती. तिची किडनी खराब झाली होती. याच दरम्यान आईचा मृत्यू झाला. माझ्या आईच्या मृत्यूसाठी मी जबाबदार आहे. मी तिला मारलं आहे. आई, मला माफ कर.'8 / 8'मी हळूहळू मरत आहे. मला रात्री झोप येत नाही. मला माफ कर. मी माझ्या वडिलांच्या जवळ नव्हते. मी त्यांचा द्वेष करायची' असं बॉबी डार्लिंगने म्हटलं आहे.