Join us  

ना जाहिरात, ना सिनेमा तरी राखी सावंत घर कसं चालवते? इतक्या कोटींची आहे मालकीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 5:08 PM

1 / 9
ड्रामा क्वीन म्हटलं की, एकच नाव डोळ्यापुढं येतं, ते म्हणजे राखी सावंत हिचं. तिचे कारनामे काय सांगावे? आज राखी तिचा 43 वा वाढदिवस साजरा करतेय.
2 / 9
राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. इंडस्ट्रीत आली आणि तिनं राखी सावंत हे नाव धारण केलं.
3 / 9
अग्निचक्र या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाºया राखीनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम साँगवर थिरकताना दिसली. आताश: चित्रपटात ती फारशी झळकत नसली तरी तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
4 / 9
आता चित्रपट नसतानाही राखीनं ही कोट्यवधींची संपत्ती जमवली कशी? असा प्रश्न काही लोकांना पडणं साहजिक आहे.
5 / 9
रिपोर्टनुसार, राखीकडे एकूण 37 कोटींची संपत्ती आहे. मुंबईत तिचे दोन अलिशान फ्लॅट्स आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधीच्या घरात आहेत.
6 / 9
काही मीडिया रिपोर्टनुसार, तिच्याकडे 11 कोटी रूपयांचा एक बंगलाही आहे. फोर्ड की एंडेव्हर आणि फोक्स वॅगनची पोलो कार आहे.
7 / 9
कधीकाळी राखीनं 50 रुपयांसाठी टीना अंबानींच्या लग्नात लोकांना जेवण वाढलं होतं. आज तीच राखी आलिशान घरात राहते.
8 / 9
सध्या राखीचा उत्पन्न स्रोत काय? तर स्टेज शो, रिअ‍ॅलिटी शो. होय, स्टेज शो हाच तिचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. देशविदेशात ती डान्स शो करते. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी होते.
9 / 9
राखीला जोरू का गुलाम, जिस देश में गंगा रहा है, ये रास्ते में अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. परंतु, तिला 2005 साली आलेल्या परदेसिया या गाण्याने खरी ओळख मिळाली. या गाण्यानंतर राखी सावंत आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली.
टॅग्स :राखी सावंत