बॉलिवूड नवाब सैफ अली खान आहे इतक्या कोटींचा मालक, वर्षाला कमावतो इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 11:33 IST
1 / 9बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याचा आज वाढदिवस. आपल्या फिल्मी करिअरमध्ये सैफने अनेक हिट सिनेमे दिलेत. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान यांच्यासारखा सुपरस्टार नसला तरी सैफकडे आज या तिघांइतकीच संपत्ती आहे.2 / 9सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा वारसदार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्याकडे एकूण 1120 कोटी रूपयांची संपत्ती आहे.3 / 9सैफला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली आहे. यापैकीच एक आहे, त्याचा पतौडी पॅलेस. कोट्यवधी रूपयांच्या या शाही महालाचा सैफ मालक आहे.4 / 9या पतौडी पॅलेसची किंमत सुमारे 800 कोटी रूपये आहे. मुंबईतही त्याची अनेक घरे आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्याचे हॉलिडे होम आहे.5 / 9फोर्ब्स 2019 नुसार, 2018-19 मध्ये सैफने 17.03 कोटींची कमाई केली. त्याच्या एकूण नेटवर्थचे म्हणाल तर त्याची स्वत:ची नेटवर्थ सुमारे 282 कोटी रूपये आहे.6 / 9मीडिया रिपोर्टनुसार, सैफ दर महिन्याला सुमारे 3 कोटी रूपये कमावतो. म्हणजेच वर्षाकाठी 30 कोटींची कमाई करतो.7 / 9चित्रपटांशिवाय जाहिरातींमधून तो सुमारे 17.03 कोटींची कमाई करतो.8 / 9 सैफ अली खानकडे अनेक महागड्या गाड्या, वस्तू आहेत. सैफकडे घडाळ्यांचे तर प्रचंड कलेक्शन आहे. तो दिवसातून तीन घड्याळ तरी बदलतो.9 / 9महागड्या गाड्यांचा शौकीन असलेल्या सैफकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. यात ऑडी, बीएमडब्ल्यू 7, क्सस 470, मस्टांग, रेंज रोव्ही, लँड क्रूजर अशा लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.