Join us  

वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती करण सिंग गोव्हरपेक्षा वरचढच आहे बिपाशा बासू, जाणून घ्या तिचे Net Worth

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 1:55 PM

1 / 10
बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री बिपाशा बासू आता काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. बिपाशा आणि करण यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आपल्या लाडक्या लेकीचं नाव बिपाशाने देवी ठेवलंय. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. (Photo Instagram)
2 / 10
बिपाशा बासूचा आज तिचा ४३वा वाढदिवस साजरा करते आहे. बिपाशा ‘अलोन’ या सिनेमात दिसली होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानंतर बिपाशा एकाही सिनेमात दिसली नाही. पण संपत्ती म्हणाल तर पती करण सिंग गोव्हरपेक्षा तिच्याकडे सातपट संपत्ती आहे.त्यानिमिताने तिच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.(Photo Instagram)
3 / 10
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, बिपाशाकडे पतीपेक्षा 7 पट अधिक प्रॉपर्टी आहे. 2020 मध्ये तिची नेटवर्थ प्रॉपर्टी सुमारे 109 कोटी रूपये आहे.(Photo Instagram)
4 / 10
बिपाशाच्या पतीचे अर्थात करणची प्रॉपर्टी किती तर त्याच्याकडे 14.16 कोटींची एकूण संपत्ती आहे. (Photo Instagram)
5 / 10
बिपाशाकडे सिनेमे नाहीत, गेल्या वर्षांपासून एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र तिच्याकडे अनेक मल्टी नॅशनल कंपन्यांच्या जाहिराती आहेत. यातून ती बराच पैसा कमावते. (Photo Instagram)
6 / 10
बिपाशा फिटनेसची दिवानी आहे. त्यामुळे रिबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, कॅडिला शूगर फ्रि अशा अनेक मोठ्या ब्रेंडच्या जाहिराती तिने केल्या आहेत. (Photo Instagram)
7 / 10
बिपाशा अनेक स्टेज शो करते. एका शोसाठी ती सुमारे 2 कोटी रूपये चार्ज करते. (Photo Instagram)
8 / 10
बिपाशाकडे मुंबईत दोन घर आहेत. कोलकात्यातही तिचे एक घर आहे. याची किंमत कोट्यावधी रूपयांच्या घरात आहे.(Photo Instagram)
9 / 10
लक्झरी गाड्यांबद्दल म्हणायचे तर ऑडी 7, पोर्शे, फॉक्सवॅगन बीटल अशा अलिशान गाड्या तिच्याकडे आहेत.(Photo Instagram)
10 / 10
आज बिपाशाकडे सिनेमांच्या ऑफर नाहीत. पण एकेकाळी ती बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींपैकी एक होती. एका सिनेमासाठी ती त्यावेळी 2 ते 3 कोटी रूपये घ्यायची. अनेक बंगाली सिनेमातही तिने काम केले आहे.(Photo Instagram)
टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर