Join us  

Bigg boss फेम 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या 44 व्या वर्षी केलं ग्लॅमरस फोटोशूट; सोशल मीडियावर होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 7:15 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिंदे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर शिल्पाने हिंदी कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.
2 / 8
सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिग बॉस ११ च्या विजेतेपदाची ट्रॉफी शिल्पा जिंकली असून तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत आहे.
3 / 8
सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिल्पा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. यात अनेकदा ती तिच्या जीवनाशी निगडीत काही गोष्टी, किस्से सोशल मीडियावर शेअर करते.
4 / 8
अलिकडेच शिल्पाने तिच्या घरी ग्लॅमरस फोटोशूट केलं असून तिचे फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चिले जात आहेत.
5 / 8
विशेष म्हणजे वयाच्या ४४ व्या वर्षीही शिल्पा प्रचंड ग्लॅमरस दिसते. तिचे हे फोटो पाहून वय हा केवळ आकडा आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे.
6 / 8
ख्रिसमसचं निमित्त साधत शिल्पाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
7 / 8
शिल्पा अनेकदा तिच्या घरी असं फोटोशूट करत असते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कायमच कमेंट्स आणि लाइक्स येत असतात.
8 / 8
ख्रिसमससाठी शिल्पाने केलेल्या फोटोशूटपैकी शेअर केलेला हा एक फोटो
टॅग्स :शिल्पा शिंदेसेलिब्रिटीबॉलिवूडटेलिव्हिजनबिग बॉस