सध्या भारतात मुक्कामाला असलेली प्रियांका चोप्रा हिने आपल्या ट्विटमध्ये बीएमसी, पोलिस अशा सगळ्यांचे हेल्पलाईन क्रमांक देत, मुंबईकरांना शक्यतोवर घरीच राहण्याचे आवाहन केले. प्लीज, घरापेक्षा सुरक्षित काही नाही. तेव्हा सुरक्षित राहा. मदत घ्या आणि मदत करा. बी सेफ मुंबई, असे ट्विट तिने केले.
अभिनेता फरहान अख्तर यानेही हेल्पलाईन क्रमांक शेअर केलेत. सोशल मीडियावर #MumbaiRains हॅशटॅग ट्रेंड करत असतानाच अभिनेत्री गुल पनाग हिने यावर टिष्ट्वट केले. ज्यानेही हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आणला, त्याला हे सांगायला हवे की,कुणीच मुंबईच्या पावसाला सेलिब्रेट करत नाहीत. याशिवाय गुलने चाहत्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्यात. घराकडे परतत असाल तर सोबत किमान दिवसभरासाठीचे खायला आणि पाणी घेऊन बाहेर पडा. तिने एक फोटो शेअर करत मुंबईत मुसळभार पाऊस कोसळणार असल्याची माहिती अपडेट केली. याशिवाय आलिया भट्ट, परिणीती चोप्रा अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईकरांना सुरक्षित राहण्याची विनंती केली. दीपिका पादुकोण , अभिषेक बच्चन यांनीही मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले.