Join us  

Baahubali फेम कटप्पाची लेक आहे प्रचंड हॉट; फोटो पाहून अनेक जण होतायेत क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 1:30 PM

1 / 10
बॉलिवूडच्या इतिहासात सुवर्णअक्षराने कोरला गेलेला चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ (Baahubali Movie). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय या जोरावर हा चित्रपट तुफान गाजला.
2 / 10
बॉक्स ऑफिसवर गाजणाऱ्या या चित्रपटातील कटप्पा, बाहुबली, देवसेना अशी अनेक पात्र गाजली. विशेष म्हणजे या भूमिका वठवणाऱ्या कलाकारांना आज प्रेक्षक त्यांच्या मूळ नावापेक्षा त्यांच्या भूमिकेच्याच नावाने ओळखतात.
3 / 10
या चित्रपटातील कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा? हा डायलॉग तुफान लोकप्रिय झाला. केवळ हा डायलॉगच नाही तर त्यासोबत कटप्पालाही विशेष लोकप्रियता मिळाली.
4 / 10
या चित्रपटात अभिनेता सत्यराज (sathyaraj) यांनी कटप्पाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या सत्यराज यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
5 / 10
आज आपण कटप्पाच्या म्हणजेच सत्यराज यांच्या लेकीविषयी जाणून घेणार आहोत.
6 / 10
सत्यराज यांच्या लेकीचं नाव दिव्या सत्यराज असं आहे. दिव्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून ती एक न्यूट्रीशनिस्ट असल्याचं सांगण्यात येतं.
7 / 10
न्यूट्रीशनिस्ट असण्यासोबतच ती एक सोशल वर्करही आहे. त्यामुळे तिला जनसेवा करण्याची विशेष आवड आहे.
8 / 10
दिव्या कलाविश्वापासून जरी दूर असली तरीदेखील सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
9 / 10
विशेष म्हणजे दिव्या सौंदर्याच्या बाबतीत आणि हॉटनेसमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींवर मात करते.
10 / 10
दिव्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर दिव्याला 92 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
टॅग्स :बाहुबलीTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा