1 / 6गतवर्षी अनुषा दांडेकर ही करण कुंद्रासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. आता यावर्षी ती आई बनल्याने चर्चेत आली आहे. अनुषाने आतापर्यंत विवाह केलेला नाही, मात्र मुलीच्या आगमनाचा आनंद तिने फँन्ससोबत शेअर केला आहे.2 / 6अनुषाने तिच्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. मात्र ती आई बनल्याची बातमी ऐकून फँन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण तिने आतापर्यंत लग्न केलेलं नाही.3 / 6अनुषा हिने मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच मुलीचं नामकरणही केलं आहे. तिने मुलीचं नाव सहारा असं ठेवलं आहे. या पोस्टमधून तिने एक छान संदेशही दिला आहे.4 / 6अनुषाने लिहिले की, अखेर माझी एक मुलगी आहे जिला मी आपली म्हणू शकते. माझी परी सहारा हिला भेटा. ती माझ्या जीवनाचं प्रेम आहे. मी तुझी खूप काळजी घेईन. मी तुझ्यावर खूप प्रेम करते- तुझी मम्मी!5 / 6अनुषा दांडेकर ही शिबानी दांडेकरची बहीण आहे. तिचं नाव करण कुंद्रासोबत जोडलं गेलं होतं. गेल्यावर्षी त्या दोघांमधील ब्रेकअपमुळे हे जोडपं खूप चर्चेत आलं होतं.6 / 6ब्रेकअपनंतर करणच्या जीवनात तेजस्वीची एंट्री झाली. तर अनुषा अजूनही सिंगल आहे. मात्र आई झाल्याचे जाहीर करत तिने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता अनुषा हिने मुलीला दत्तक घेतले आहे की ती सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.