Join us  

IN PICS : अनुराग कश्यपची लेक प्रेमात, सांगितला ‘फर्स्ट किस’चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 2:14 PM

1 / 10
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही.
2 / 10
सध्या आलिया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, सध्या तिच्या लव्ह लाईफच्या चर्चा जोरात आहेत.
3 / 10
खुद्द बॉयफ्रेंडसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. आलियाने हा सगळा किस्सा आपल्या युटयूब चेनेलवर सांगितला आहे.
4 / 10
आलिया कश्यप सध्या शेन ग्रेगवॉ या अमेरिकन तरूणालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
5 / 10
शेन व आलिया सर्वप्रथम एका डेटींग अ‍ॅपवर भेटले होते.यानंतर दोन महिने दोघेही एकमेकांसोबत बोलत होते.
6 / 10
2 महिन्यानंतर दोघांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या डेटवर शेन आपल्याला किस करेल, अशी आलियाची अपेक्षा होती. पण शेन पुढाकार घेईना, मग काय तर आलियालाच पुढाकार घ्यावा लागला.
7 / 10
तिने सांगितले, ‘आम्ही बोलत होतो, मात्र शेन मला किस करण्यात कचरत होता. कदाचित मी यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही, याचा विचार तो करत असावा़ अखेर मीच पुढाकार घेतला.
8 / 10
तिने पुढे सांगितले, पहिला किस हा खूपच विचित्र प्रासंग होता. आम्ही काहीतरी बोलत होतो आणि मी मध्येच शेनला किस केले होते.
9 / 10
आलिया ही अनुराग आाणि त्याची पत्नी आरती बजाजची मुलगी आहे.
10 / 10
आलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे हॉट व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
टॅग्स :अनुराग कश्यप