1 / 7बॉलिवूड स्टार आलिया भटने नुकतेच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग पूर्ण केले. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर सेटवरील काही सुंदर छायाचित्रे शेअर करून दिली. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत नव्हता.आता या चित्रपटाच्या सेटवरील आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. जिथे अभिनेत्री तिच्या बेबी बंपसोबत हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाचे शूटिंग करताना दिसत आहे. 2 / 7व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री आलिया भट बेबी बंपसोबत अॅक्शन सीन शूट करताना दिसत आहे.3 / 7काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. यानंतर चित्रपटातील कलाकार अभिनेत्री आलिया भटचे जोरदार अभिनंदन करताना दिसले. आता अभिनेत्रीचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.4 / 7विशेष म्हणजे, अभिनेता आलिया भट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले. हे लग्न अभिनेत्रीने तिच्या आणि रणबीर कपूरच्या घरीच केले होते.5 / 7बाकी चित्रपट अभिनेत्रींसाठी आलिया भट एक आदर्श ठेवणार आहे असे दिसते. अभिनेत्रीने तिच्या हॉलिवूड चित्रपटासाठी गरोदरपणात कठीण सीन्स शूट केले आहेत.6 / 7आलिया भट वंडर वुमन फेम अभिनेत्री गाल गडोतसोबत तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.7 / 7आलिया भट प्रेग्नेंसीतही शूटिंग करते आहे, हे पाहून तिचे चाहते तिचे कौतुक करत आहेत.