By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 19:26 IST
1 / 7अभिनेत्री आलिया भटने तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्ताने सर्वांनाच चकीत केले. तेव्हापासून मीडियापासून चाहत्यांपर्यंत सर्वांच्या नजरा आलिया आणि तिचा पती रणबीर कपूरवर लागल्या आहेत. 2 / 7आलियाचा प्रेग्नेंसी लूक खूप पसंत केला जात आहे आणि चाहते आलियाच्या नवीन फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. 3 / 7आलिया भट तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज झाली आणि तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. 4 / 7आलिया भटला नुकतीच ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी पती रणबीर कपूर आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत दिसली होती. आलियाने वन पीस ड्रेस घातला होते. तिने तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या फॅनक्लबनेही शेअर केले आहेत.5 / 7आलियाने या फोटोत एक सैल-फिटिंग ड्रेस घातला आहे ज्यावर पुरुषाचा चेहरा आहे आणि बॅकग्राउंडला बरेच काही लिहिले आहे. 6 / 7 यासोबतच आलियाने निळ्या रंगाची हाय हिल्स घातली असून तिच्या हातात अनेक अंगठ्या आहेत. 7 / 7आलियाने कदाचित तिचा बेबी बंप लपवण्यासाठी सैल ड्रेस घातला आहे.