1 / 9१२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) ला दिमाखात सुरुवात झाली. बॉलिवूडची 'बार्बी गर्ल' आलिया भट 'कान्स'मध्ये सहभागी झाली आहे.2 / 9 एकापेक्षा एक सुंदर लूकमधून आलिया आपल्या सौंदर्याची मोहिनी घालते आहे. आलियाचा कान्समधला तिचा तिसरा लूकही व्हायरल झाला आहे.3 / 9आलियाच्या पारंपारिक आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.4 / 9आलियाने इंडिया पॅव्हेलियनसाठी आयव्हरी रंगाच्या साडीची निवड केली होती. 5 / 9 पारंपारिक ब्लाउजऐवजी तिने 'कोटा' शैलीतील ब्लाउज परिधान केला होता, ज्यामुळे तिच्या लूकला आधुनिक टच मिळाला.6 / 9भडक मेकअप टाळून आलियाने अत्यंत साध्या लूकमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कपाळावरील लहान टिकली आणि नाकातील नथीमुळे तिचा लूक अधिकच उठून दिसला.7 / 9या कार्यक्रमात आलियासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर देखील उपस्थित होते. या दोघांनी मिळून ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) अधिकृत पोस्टर आणि 'क्रिएटीव्ह व्हिजन' लाँच केले. 8 / 9आलिया भटने गेल्या वर्षीच कान्समध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या लूकचं तेव्हाही कौतुक झालं होतं आणि यंदाही तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. 9 / 9आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'लव्ह अँड वॉर' आणि 'अल्फा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.