Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय खन्नाला बॉलिवूडमधली 'ही' अभिनेत्री वाटायची सगळ्यात सेक्सी, म्हणाला- "तिच्याकडे फक्त बघतच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:44 IST

1 / 8
'धुरंधर' या सिनेमात रहमान डकैतची भूमिका साकारल्याने अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षयच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
2 / 8
जिकडे तिकडे फक्त अक्षय खन्ना आणि त्याच्या स्वॅगची चर्चा होताना दिसत आहे. अशातच त्याची जुनी मुलाखत व्हायरल होते आहे.
3 / 8
अक्षय खन्नाने करण जोहरच्या एका मुलाखतीत हजेरी लावली होती. या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हेदेखील उपस्थित होते.
4 / 8
या मुलाखतीत अक्षय खन्नाला करण जोहरने 'बॉलिवूडमधली सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण?' असा प्रश्न विचारला होता.
5 / 8
या प्रश्नाचं उत्तर देताना अक्षय खन्नाने ऐश्वर्या रायचं नाव घेतलं होतं. 'मी जेव्हा जेव्हा तिला भेटतो तिच्याकडे बघतच राहतो. तिच्यावरुन सहज कोणालाही नजर हटवता येत नाही', असं तो म्हणाला होता.
6 / 8
पुढे त्याने म्हटलं होतं की 'खरंतर तिला आता या सगळ्याची सवय झालीये. पण एका पॉइंटला आपल्याला लाज वाटते अरे आपण किती वेळ बघतोय'.
7 / 8
'ती सुंदर आहेच पण मनाने सुद्धा ती तेवढीच सुंदर आहे. ताल सिनेमात आम्ही एकत्र काम केलं होतं... खरंच ती खूप छान काम करते', असंही अक्षय खन्ना म्हणाला होता.
8 / 8
अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय या दोघांनी एकत्र 'ताल', 'आ अब लौट चले' या सिनेमांमध्ये काम केलं होतं.
टॅग्स :अक्षय खन्नाऐश्वर्या राय बच्चन