Join us

अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:29 IST

1 / 8
रक्षाबंधन हा भावा-बहिणींचं नातं आणखी घट्ट करणारा सण आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या १७ वर्षांपासून अभिनेता सोनू सुदला राखी बांधत आहे.
2 / 8
२००८ मध्ये आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट 'जोधा अकबर' च्या सेटवर या नात्याला सुरुवात झाली. चित्रपटात ऐश्वर्याने महाराणी जोधाबाईची भूमिका साकारली होती.
3 / 8
सोनूने तिचा भाऊ कुंवर सुजामलची भूमिका साकारली होती, जो आपल्या बहिणीसाठी आपलं राज्य पणाला लावण्यास तयार होता. पडद्यावर भाऊ-बहिणीची ही केमिस्ट्री वास्तविक जीवनात एका सुंदर नात्यात बदलली.
4 / 8
राखी बांधण्याचे हे बंधन 'जोधा अकबर'च्या शूटिंगदरम्यान सुरू झालं होतं, जेव्हा ऐश्वर्याने सेटवरच सोनूला राखी बांधली होती. तेव्हापासून दर रक्षाबंधनाला सोनू ऐश्वर्याला भेटायला येतो आणि ती त्याल राखी बांधते.
5 / 8
द टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, सोनूने जोधा अकबरच्या सेटवरील एक गोड आठवण सांगितली, की सुरुवातीला लाजाळू असलेल्या ऐश्वर्याने एका दृश्यादरम्यान त्याला म्हटलं होतं, तुमच्यामुळे मला अमिताभ बच्चन यांची आठवण येते.
6 / 8
सोनूने यावेळी ऐश्वर्या त्याला प्रेमाने 'भाई साहब' अशी हाक मारत असल्याचं देखील सांगितलं, जे त्यांच्यातील खास नातं दर्शवतं.
7 / 8
सोनू सूदचे बच्चन कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि अभिषेक बच्चनसोबत काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
8 / 8
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, सोनूने बच्चन कुटुंबाचं भरभरून कौतुक केलं आणि हे 'शानदार लोक' आहेत ज्यांच्याशी खूप चांगली मैत्री आहे असं सांगितलं.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसोनू सूदरक्षाबंधनबॉलिवूड