Join us
Daily Top 2Weekly Top 5

वय हा निव्वळ आकडा ! वयाची पासष्टी उलटूनही रेखा दिसतात तितक्याच सुंदर, लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:14 IST

1 / 11
६८ वर्षीय रेखा आता चित्रपटांमध्ये कमी दिसत असल्या तरीही लोक त्यांच्या सौंदर्याचे दीवाने आहेत. रेखा जेव्हा केव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा अवॉर्ड शोमध्ये जातात तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.
2 / 11
नुकतेच रेखा यांनी एका मासिकासाठी इतके ग्लॅमरस फोटोशूट केले आहे की, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेखा या फोटोत इतक्या सुंदर दिसत आहेत की त्यांच्या सौंदर्यावरुन नजर हटणे मुश्किल झाले आहे.
3 / 11
रेखा यांनी या फोटोशूटमध्ये डार्क रंगाची लिपस्टिक, भांगेत कुंकू आणि गोल्डन रंगाच्या साडीसोबत हेवी डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.
4 / 11
या फोटोशूटमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत आहेत.
5 / 11
या फोटोशूटमध्ये रेखा एक नाही तर वेगवेगळ्या ६ लूकमध्ये दिसत आहे. प्रत्येक लूकमध्ये त्या खूप स्टनिंग दिसत आहेत.
6 / 11
फोटोत रेखा यांनी इंडियन स्टाईलमधील गोल्डन कलेक्शनचे आउटफिट परिधान केले आहेत.
7 / 11
कधी त्यांनी अनारकली परिधान केलीय तर कधी साडी...तर कधी महाराणी लूक.
8 / 11
रेखा यांनी वोग मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रींचे ड्रेस डिझाइन मनीष मल्होत्रा यांनी केले आहे.
9 / 11
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत रेखा यांच्या भांगेतल्या कुंकूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
10 / 11
रेखा यांनी दोन वेळा लग्न केले. मात्र आजही त्या एकट्याने जीवन जगत आहेत.
11 / 11
(सर्व फोटो - वोग अरेबिया)
टॅग्स :रेखा