1 / 8अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अलिकडेच आसाममधील कामाख्या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 8अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने यावेळी पंजाबी ड्रेस परिधान केला. नो मेकअप लूकमध्ये ती दिसली.3 / 8तिच्या कपाळावर लाल टिळा लावलेला दिसला आणि फोटोत ती मंदिरात धार्मिक विधी करताना दिसली.4 / 8उर्मिलाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, कामाख्या मंदिर. मुसळधार पाऊस.. रस्ते बंद..शहर ठप्प…पण दर्शन तर घ्यायचे होते. जीवनातील बऱ्याच गोष्टींसोबत हे पण आईवर सोडून दिलं. आज बोलवणं आलं आणि दर्शनही मिळालं. #नोमेकअप #नोग्लॅमर बस.. भक्ती 5 / 8गुवाहाटीतील नीलाचल टेकड्यांमध्ये असलेले कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे.6 / 8उर्मिला मातोंडकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.7 / 8उर्मिला मातोंडकरने हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम केले आहे.8 / 8२०२२ मध्ये, उर्मिलाने सौरभ वर्मा दिग्दर्शित 'तिवारी' या वेब सिरीजद्वारे पुनरागमनाची घोषणा केली. ही कथा कल्की तिवारी या एका महिलेची आहे, जी चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकली गेली आहे, जी तिच्या सुटकेनंतर तिला फसवण्यासाठी जबाबदार असलेल्या पुरूषाचा शोध घेण्यास निघते.