कधीकाळी व्हीजे होती रिया चक्रवर्ती, सुशांतआधी या अभिनेत्याशी जुळले होते नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:11 IST
1 / 12रियाने तिच्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवरचा रिअॅलिटी शो ‘टीन दिवा’पासून केली होती. या शोची ती रनरअप होती.2 / 12यानंतर एमटीव्हरचे अनेक शो तिने होस्ट केलेत.3 / 12 रियाने बँड बाजा बारात या सिनेमासाठी आॅडिशन दिले होते. पण यात ती रिजेक्ट झाली होती.4 / 12सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही लवकरच लग्न करणार होते, असे कळतेय. सुशांतआधी रियाचे नाव अभिनेता आदित्य राय कपूरसोबत जोडले गेले होते.5 / 12रिया व आदित्य अनेकदा एकत्र दिसल्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.6 / 12मेरे डॅड की मारूती या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. 7 / 12 2012 मध्ये तिने तुनेगा तुनेगा या चित्रपटातून तेलगू सिनेमात डेब्यू केला होता.8 / 12यानंतर सोनाली केबल या बॉलिवूडच्या सिनेमातही ती झळकली.9 / 12अलीकडे ‘जलेबी’ हा तिचा सिनेमा रिलीज झाला होता.10 / 12रिया अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. पण अद्यापही तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.11 / 12चित्रपटांपेक्षा सुशांतसोबतच्या अफेअरमुळेच ती अधिक चर्चेत आली.12 / 12सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी रियाची चौकशी केली होती.