IN PICS : ‘बेगम’ करिना कपूर खान आहे इतक्या कोटींची मालकीण, छोट्याशा बॅगसाठी मोजते इतके पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 13:19 IST
1 / 9बॉलिवूडची बेबो करीना कपूर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. नव्या बाळाच्या स्वागतासाठी ती आतूर आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीसाठी ती उत्सुक आहे. ती काय, तर तिचे ड्रिम होम.2 / 9होय, करिना लवकरच तिच्या ड्रिम होममध्ये शिफ्ट होणार आहे. सध्या या घराच्या रिनोवेशनचे काम सुरु आहे. करिनाने नुकतीच सोशल मीडियावर या घराची एक झलक दाखवली होती.3 / 9आता नवाब सैफ अली खानची बेगम म्हटल्यावर करिनाला काय कमी, असा विचार तुम्ही कराल. पण करिनाची व्यक्तिगत संपत्तीही कमी नाही. करिना बॉलिवूडच्या टॉप 5 महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.4 / 9बेबोची लाइफस्टाइलही तेवढीच भन्नाट आहे. तिच्या पर्सची किंमत एका मध्यमवर्गीय लोकांच्या कारपेक्षा अधिक आहे.5 / 92004 मध्ये करिनाकडे 74.47 कोटींची संपत्ती असल्याची नोंद झाली होती. फोर्ब्जच्या सर्वात पॉवरफूल सेलिब्रिटींच्या यादीत तिने सातवा नंबर पटकवला होता. आता तिच्याकडे 413 कोटींची संपत्ती असल्याची नोंद झाली आहे. 6 / 9करिना एका चित्रपटासाठी सुमारे 10 ते 17 कोटी रूपये घेते. एका टीव्ही शोसाठी सुमारे 3 कोटी रूपये आकारते.7 / 9करीनाला वेगवेगळ्या प्रकारच्या हँडबॅग्ज खरेदी करायची खूप आवड आहे. बिर्किन 35 रोजची हँड बॅग करिना अनेकदा मिरवताना दिसते. याची किंमत 10 लाखाच्या जवळपास आहे. बेबोकडे बॅग्जचे मोठं कलेक्शन आहे8 / 9तिच्याकडे इटह, टोयॉटा, लँड क्रूझर अशा एकापेक्षा एक भन्नाट कार आहेत. त्यातील इटह ही कार सैफ अली खानने तिला गिफ्ट केली होती.9 / 9 करीना लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसणार आहे. थ्री इडियट्सनंतर करीना आणि आमिरला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.