Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सध्या SR म्हणतेय, २५ जानेवारीनंतर ठेवणार 'हे' नाव'; आलियाचा शाहरुख खानला भन्नाट रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 13:28 IST

1 / 7
'डिअर जिंदगी' चित्रपटात एकत्र काम करणारी जोडी शाहरूख खान आणि आलिया भट हे सध्या त्यांच्या वैयक्तिक पातळीवर प्रचंड चर्चेत आहेत.
2 / 7
ते म्हणजे शाहरूख 'पठाण' चित्रपटासाठी तर आलिया तिचे मदरहूड एन्जॉय करतेय म्हणून.
3 / 7
आता बातमी अशी आहे की, शाहरूख खानने अलीकडेच त्याच्या चाहत्यांसोबत ट्विटरवर #AskSRK सेशन केले.
4 / 7
या सेशनदरम्यान चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. एका युजरने विचारले, आलिया तुला 'SR' का बोलते? त्यावर शाहरूखने त्याच्या नेहमीच्या अंदाजात अत्यंत भन्नाट उत्तर दिले.
5 / 7
तो म्हणाला, कदाचित स्वीट आणि रोमँटिक, सिनियर आणि रिस्पेक्टेड किंवा केवळ शाहरूख खान. त्यावर आलियानेही रिप्लाय दिला की, स्वीट आणि रोमँटिक.
6 / 7
पुढे आलिया म्हणाली की, मी अत्यंत क्रिएटिव्ह आहे. २५ तारखेनंतर मी तुला पठाण म्हणणार आहे.
7 / 7
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झाले. यात दीपिकाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. पण दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगातील बिकीनीत दिसली आहे. यावरुनच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदू संघटनांनी दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला विरोध केला आहे. हिंदू महासभाचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनीही 'पठाण' चित्रपटावर बहिष्काराची मागणी केलीय.
टॅग्स :शाहरुख खानआलिया भटपठाण सिनेमा