Join us
Daily Top 2Weekly Top 5

गारांचा वर्षाव अन् अभिनेत्रीच्या हॉट अदा, 'धुरंधर' अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:41 IST

1 / 7
कडाक्याच्या थंडीत गरम पाण्याच्या पूलमध्ये एक बॉलिवूड अभिनेत्री नवीन वर्षाचं स्वागत करत आहे. ही अभिनेत्री आहे अहाना कुमरा.
2 / 7
चोहीकडे बर्फ साचलेला असताना आणि स्नोफॉल होत असताना अहाना काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये गरम पाण्याच्या पूलमध्ये उतरली आहे.
3 / 7
अहानाचा हा हॉट अवतार चाहत्यांना आवडला असला, तरी अनेकांनी तिला तब्येतीच्या काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. एकूणच अहानाने नवीन वर्षाचं एकदम खास अंदाजात स्वागत केलं आहे.
4 / 7
अहाना कुमरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता दानिश पंडोरला डेट करत असल्याची चर्चा आहे. दानिशने नुकतंच 'धुरंधर' सिनेमात उझैर बलोचची भूमिका साकारली होती.
5 / 7
दानिश आणि अहानाने त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा केला नसला तरीही त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात
6 / 7
अहाना कुमरा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' आणि 'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते. याशिवाय ती हिंदी-इंग्रजी रंगभूमीवरही सक्रीय आहे.
7 / 7
एकूणच अहाना कुमरा अभिनयासोबतच तिच्या फिटनेसलाही चांगलंच महत्व देताना दिसते. त्यामुळे अभिनेत्रीने नवीन वर्षाचं खास अंदाजात अहानाने स्वागत केलंय
टॅग्स :अहाना कुमराधुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्ना