Join us

अभिनेते मेहमूद यांची नात दिसायला आहे खूप सुंदर, दिशा पटानी आणि नोरा फतेही हॉटनेसमध्ये तिच्यासमोर फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:23 IST

1 / 9
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिवंगत मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना आजही भावते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले. पडोसन, कुंवारा बाप, बॉम्बे टू गोवा, गुमनाम यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
2 / 9
आज आम्ही तुम्हाला मेहमूद यांच्या नातीबद्दल सांगणार आहोत, जी सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहून आलिशान आयुष्य जगते आहे. खऱ्या आयुष्यात ती दिशा पाटनी आणि नोरा फतेही या अभिनेत्रींपेक्षा खूपच हॉट आहे.
3 / 9
चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त, अभिनेते मेहमूद अली यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत होते. विशेषतः त्यांची दोन लग्नं. त्यांनी पहिले लग्न १९५३ मध्ये मधु अलीसोबत केले आणि नंतर १९६७ मध्ये घटस्फोटानंतर ट्रेसी अली यांना पत्नी बनवले. मेहमूद यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा झाला, तो म्हणजे गायक आणि अभिनेते लकी अली.
4 / 9
लकी अली यांना पाच मुले आहेत, ज्यात त्यांची तिसरी मुलगी तस्मीया अली (Tasmiyah Ali) जिच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
5 / 9
तस्मीया खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि हॉट आहे. याचा अंदाज तुम्ही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटो पाहून सहज लावू शकता. तिचे हॉट फोटोशूट पाहून तुम्ही थक्क व्हाल.
6 / 9
तस्मीया अलीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयात पाऊल ठेवले नाही. तिला गायनाची आवड आहे.
7 / 9
साउंड क्लाउडवर तिच्या नावाचे आयडी आहे, जिथे ती आपल्या मधुर आवाजात अप्रतिम गाणी अपलोड करते. आपले वडील लकी अली यांच्याप्रमाणेच तस्मीयाकडेही गायनाची उत्कृष्ट कला आहे.
8 / 9
एक गायिका असण्यासोबतच, तस्मीया अली एक सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर आहे. ती आपल्या कुटुंबासोबत भारतात राहत नाही.
9 / 9
तिने न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये आपलं घर वसवलेलं आहे आणि ती तिथेच राहते. लकी अली यांच्या मुलीचे सौंदर्य एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही.
टॅग्स :मेहमूदलकी अली