By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:49 IST
1 / 8बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. तिने सर्वात आधी तिने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर उदयपूरमध्ये तिने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2 / 8 उदयपूरवरुन आल्यावर आयराच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, आमिर खानचा मोठा मुलगा जुनैदने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.3 / 8आमिर खान आणि रीना दत्ता यांना जुनैद व आयरा ही दोन मुले आहेत. तर किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. आता आयराच्या लग्नासाठी संपूर्ण खान कुटुंबीय एकत्र आले होते.4 / 8 त्यांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद चर्चेत आला होता. अभिनेत्याची दोन्ही मुले आयरा आणि जुनैद सिनेइंंडस्ट्रीपासून लांब होती.5 / 8जुनैद खाचा जन्म १९९३ साली झाला होता. सध्या तो ३० वर्षांचा आहे. जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्यासाठी त्याने वडील आमिर खानची मदत घेतलेली नाही. याबद्दल आमिर खानने स्वत: माहिती दिली होती. जुनैदला पहिला चित्रपट मिळण्यापूर्वी १५ वेळा नकार मिळाला होता, असे देखील त्याने सांगितले होते. 6 / 8जुनैद हा २०१८ पासून नाटकांमध्ये काम करत आहे. त्याने अभिनयाचे धडे गिरवले असून आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज बॅनर खाली तयार होणाऱ्या 'महाराजा' या चित्रपटातून तो निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. 7 / 8तसेच अभिनेता म्हणून देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत खूप उत्सुकता आहे.8 / 8जुनैदचे राहणीमान हे अतिशय साधे आहे. तो प्रवास करताना लग्झरी गाड्या किंवा विमानाचा वापर करत नाही. तो अनेकदा ट्रेनने प्रवास करणे योग्य मानतो. रेल्वेच्या प्रवासाला तो प्राधान्य देतो. आमिर खानने याबाबत माहिती दिली होती.