Join us  

आमिर खानचा भाचा इमरान खानने बॉलिवूडला ठोकला राम-राम, तर 'या' क्षेत्रात करणार काम !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 12:39 PM

1 / 8
इमरानचा जवळचा मित्र अक्षय ओबरॉयने दिलेल्या एका मुलाखतीत इमराने अभिनय सोडले असल्याचे सांगितले आहे.
2 / 8
अक्षयने सांगितले की, इमरान माझा खुप चांगला मित्र आहे. मी त्याला सकाळी चार वाजताही फोन केला तरी मला खात्री आहे तो माझा फोन उचलेल इतकी आमची चांगली मैत्री आहे. गेल्या १८ वर्षांपासून आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत.
3 / 8
इमरान आता अभिनय करताना दिसणार नाही. मात्र दिग्दर्शन करताना नक्की दिसेल असेही अक्षयने सांगितले.
4 / 8
इमरान खानला सिनेमाबद्दल चांगली माहिती आहे, अशा परिस्थितीत तो स्वतःचा एखादा चित्रपट दिग्दर्शित करू शकतो.
5 / 8
सध्या प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत करत आहे.
6 / 8
करियरमध्ये मिळणारं अपयश इमरानलाही रूचलं नसावं म्हणूनच त्याने आता दिग्दर्शन करण्याचे ठरवले असावे.
7 / 8
इमरानने आमिर खानच्या सुपरहिट सिनेमा 'कयामत से कयामत' आणि 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातही बाल कलाकार म्हणून काम केले होते.
8 / 8
अभिनेत इमरान खानचे फिल्मी करिअर बुडाल्यात जमा आहे.
टॅग्स :इमरान खानआमिर खान