Join us

कान्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा

By admin | Updated: May 15, 2015 00:00 IST

स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटाद्वारे घराघरांत पोहोचलेली सुंदर अभिनेत्री फ्रिडा पिंटोही कान्सला उपस्थित होती.फॅशन आयकॉन सोनम कपूरही गेल्या अनेक ...

स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटाद्वारे घराघरांत पोहोचलेली सुंदर अभिनेत्री फ्रिडा पिंटोही कान्सला उपस्थित होती.

फॅशन आयकॉन सोनम कपूरही गेल्या अनेक वर्षांपासून कान्सला हजेरी लावते. तिचे खास आऊटफिट्‌स आणि तिचं किलर स्माईल सगळ्यांचच लक्ष वेधून घेतं.

लंचबॉक्स या उत्कृष्ट चित्रपटातील अभिनेते निम्रत कौर आणि इरफान खान कान्स फेस्टिव्हलदरम्यान उपस्थित होते.

आपल्या अभिनयापेक्षा बोल्ड दृष्य आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणा-या मल्लिका शेरावतने अनेक वेळा खास पेहरावात कान्सला हजेरी लावली.

गुणी अभिनेत्री विद्या बालनने खास भारतीय पेहरावांमध्ये या फेस्टिव्हलला हजेरी लावली. चकचकीत ग्लॅमडॉल्सच्या गराड्यात विद्याचा खानदानी पेहराव सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता.

अस्सल सौंदर्यवती आणि नामवंत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून कान्सला हजर रहात असून प्रत्येक वेळेस तिने रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली आहे.

68 व्या आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलला नुकतीच सुरूवात झाली असून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफने यावर्षी पहिल्यांदाच या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावत रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकार या फेस्टिव्हलला उपस्थित होते.