Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई बंगाली अन् वडील जर्मन पण 'ही' अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:12 IST

1 / 7
दीया मिर्झा ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००१ मध्ये आलेल्या 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
2 / 7
पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्रीला स्टारडम मिळाला. निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
3 / 7
परंतु प्रोफेशनल आयुष्यापेक्षा दीया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. दिया मिर्झाचे जन्मदाते वडील फ्रँक हँड्रिच हे मुळचे जर्मन होते. तर तिची आई ही बंगाली होती.
4 / 7
दीया ५ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून तिचे पालक एकमेकांपासून वेगळे राहू लागले. पण, अभिनेत्री मुस्लिम आडनाव का लावते? यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत.
5 / 7
खरंतर, दीया मिर्झाच्या आईने घटस्फोटानंतर हैदरबादमधील अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्नागाठ बांधली. फ्रँक हँड्रिच यांच्या निधनानंतर सावत्र वडिलांनी अभिनेत्रीला वडिलांचं प्रेम दिलं.
6 / 7
एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री दीयाने ती मिर्झा हे आडनाव का लावते, याबद्दल खुलासा केला होता. त्यादरम्यान अभिनेत्रीने सांगितलं होतं की, 'आमच्यामध्ये एक सुंदर असं नातं निर्माण झालं आहे. ज्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. मी माझ्या आयुष्यातील बराच काळ त्यांच्यासोबत घालवला आहे.'
7 / 7
पुढे दीया म्हणाली, 'त्यांनी मला मुलीप्रमाणे वाढवलं, त्यामुळे मी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाले तेव्हा आपल्या नावासोबत त्यांचं आडनाव लावण्याचा निर्णय घेतला'.असा खुलासा अभिनेत्रीने केला.
टॅग्स :दीया मिर्झाबॉलिवूडसेलिब्रिटी