एकेकाळची मिस इंडिया, सौंदर्याची आजही होते चर्चा! इंडस्ट्रीतून अचानक झाली गायब; देओल कुटुंबाशी खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:02 IST
1 / 7सौंदर्य आणि प्रतिभा असतानाही नशीबात यश नसल्याने, हिंदी चित्रपटसृष्टीत अयशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे दिप्ती भटनागर. 2 / 7 सौंदर्यात माधुरी, रवीनाला टक्कर देणारी अभिनेत्री दिप्ती भटनागरने ९० चा काळ गाजवला होता. दीप्ती भटनागरचा जन्म ३० सप्टेंबर १९६७ ला उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला.3 / 7 १९९० मध्ये मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. यशस्वी मॉडेलिंगच्या क्षेत्रातून लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. १९९५ मध्ये आलेल्या रामशास्त्र या चित्रपटातून तिचे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.4 / 7 दिप्ती भटनागरने हिंदीसह तेलूगु, तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'हमसे बढकर कौन', 'दुल्हन बनू मैं तेरी', 'मन' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.5 / 7 दीप्ति भटनागरने टीव्ही शो 'यात्रा' होस्ट केला होता. त्या शोच्या माध्यमातून ती घराघरात जाऊन पोहोचली होती. देशभरातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांची तिने माहिती दिली होती.6 / 7 दिप्तीने दिग्दर्शक रणदीप आर्य यांच्याशी विवाह केला.त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावली. या दाम्पत्याला शुभ आणि शिव ही दोन अपत्ये आहेत.7 / 7दीप्ती भटनागर देओल कुटुंबाचा भाग असल्याचं खूप कमी जणांना माहिती आहे.ती धर्मेंद्र यांची सून आहे. ती धर्मेंद्र यांची सून आहे. दिप्तीचा पती रणदीप धर्मेंद्र यांच्या चुलत भावाचा मुलगा आहे.