Kishori Shahane: खूप सुंदर आहे किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी, त्याच्या फिल्मी जगतातील पदार्पणाबाबत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 23:17 IST
1 / 8अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी मराठी चित्रपटांसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या सिनेजगतातील प्रवासाबाबत त्या समाधानी आहेत. त्यांचा मुलगा बॉबी विज हासुद्धा त्याच्या आईप्रमाणे सुंदर आहे. २५ वर्षीय बॉबीच्या मनोरंजन क्षेत्रातील पदार्पणासाठी आता किशोरी शहाणे प्रयत्नशील आहेत. 2 / 8किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी विज हासुद्धा चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी इच्छुक आहे. मात्र त्याला अद्याप योग्य अशी संधी मिळालेली नाही. 3 / 8बॉबीबाबत किशोरी शहाणे म्हणाल्या की, त्यांचा मुलगा खूप लहान वयापासून थिएटरमध्ये काम करत आहे. आता त्याला योग्य ओळख मिळाली पाहिजे, असे मला वाटते. 4 / 8बॉबीला चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला पाहिजे, असे किशोरी शहाणे यांना वाटते. 5 / 8किशोरी शहाणे यांनी सांगितले की, त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये अनेक दशकांपासून काम केले आहे. आता त्यांच्या मुलालाही असा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 6 / 8त्या म्हणाल्या की बॉबी खूप टॅलेंटेड आहे. तो ज्या कुणाशी बोलतो ते त्याच्यावर प्रभावित होतात. 7 / 8बॉबीला त्याच्या टॅलेंटच्या बळावर काम द्या, मात्र त्याला संधी तर द्या, असं आवाहन त्यांनी केलं. 8 / 8किशोरी शहाणे सांगतात की, त्यांची कुणावर तक्रार नाही आहे. मात्र सध्या प्रसिद्ध सेलेब्रिटी नव्या टॅलेंटला संधी देत नाहीत.