Join us  

Bipasha Basu Birthday: गेल्या ६ वर्षापासून एकाही सिनेमात झळकली नाही, तरीही करते भरभक्कम कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 1:20 PM

1 / 11
बिपाशा शेवटची 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' चित्रपटात झळकली होती.बिपाशाला अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करण्याची संधीच मिळाली नाही.
2 / 11
तरीही संपत्तीच्या बाबतीत ती कोणापेक्षाही कमी नाही. प्रॉपर्टीच्या बाबतीत बिपाशा तिचा पती करण सिंग ग्रोव्हरलाही टक्कर देते.रिपोर्ट्सनुसार, बिपाशा पती करणपेक्षा 7 पटीने श्रीमंत आहे.
3 / 11
बिपाशा बसूची एकूण संपत्ती 15 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 111 कोटी रुपये आहे, तर पती करण सिंग ग्रोव्हरची संपत्ती 2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच केवळ 15 कोटी रुपये आहे. बिपाशाकडे सध्या चित्रपट नसतील,पण तिच्याकडे अनेक कंपन्यांच्या जाहिराती आहेत.
4 / 11
बिपाशा बसूही फिटनेसबाबत चर्चेत असते. तिने रिबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, फा डियोड्रेंट, गिली ज्वैलरी, कैडिला शुगर फ्री गोल्ड, हेड एंड शोल्डर शैम्पू यासह अनेक कंपन्यांसाठी जाहिराती केल्या आहेत. या बड्या ब्रँडच्या जाहीरातीतून तिने भरभक्क कमाई केली आहे.
5 / 11
बिपाशा बसूची मुंबईच्या पॉश भागात दोन फ्लॅटही खरेदी केले आहेत,ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. याशिवाय तिचे कोलकातामध्येही आलिशान बंगला आहे.इतकंच काय तर लक्झरियस गाड्यांचे कलेक्शनही तिच्याकडे आहे बिपाशाकडे ऑडी 7, पोर्शे, फोक्सवॅगन बीटल सारखी लक्झरी वाहने आहेत.
6 / 11
बिपाशा बसू अनेक स्टेज शो देखील करते, ज्यासाठी ती प्रत्येक शोसाठी सुमारे 2 कोटी रुपये घेते. बिपाशा 40 हून अधिक मासिकांच्या कव्हर पेजवर देखील झळकली आहे. बिपाशा फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. काही काळापूर्वी तिने 'लव्ह युवरसेल्फ ब्रेक फ्री' नावाची डीव्हीडीही लॉन्च केली होती.
7 / 11
बिपाशा बसूला अद्याप चित्रपटांच्या ऑफर नसतील, परंतु एक काळ असा होता जेव्हा ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जायची.बिपाशा एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये इतके मानधन घेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिपाशा आणि तिचा पती करण ग्रोवर 'आदत' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
8 / 11
मालिका आणि चित्रपटांव्यतिरिक्त करणने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम करून आपली चांगलीच कमाई केली आहे. करणने फियर फॅक्टर, आइडिया रॉक्स इंडिया आणि जरा नचके दिखा यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.
9 / 11
याशिवाय काही जाहिरातींमध्येही काम केले. करणने रूपा फ्रंटलाइन बनियन, Cleartrip.com आणि कजारिया टाइल्स सारख्या कंपन्यांसाठी जाहिराती केल्या आहेत.
10 / 11
करण सिंग ग्रोव्हरकडे ऑडी 7 कार आहे आणि मुंबईच्या हायराईज अपार्टमेंट्समध्ये फ्लॅट आहे. करणने त्याच्या करिअरची सुरुवात MTV या शो 'कितनी मस्त है जिंदगी'मधून केली होती.
11 / 11
हळूहळू करणने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आणि त्याच्या कमाईतही वाढ होत गेली.नंतर करणने 'दिल मिल गये' आणि झीटीव्हीचा लोकप्रिय शो 'कबूल है' मध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली. रिपोर्ट्सनुसार, करण एका दिवसाच्या शूटसाठी 80,000 रुपये इतके मानधन घ्यायचा.
टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर