By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:33 IST
1 / 9राकेश बापट हे नाव मराठी आणि हिंदीतही परिचयाचं आहे. हँडसम हिरो म्हणून तो तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. राकेश सध्या बिग बॉस मराठी ६ मध्ये दिसत आहे.2 / 9गेल्या काही दिवसांपासून राकेश चर्चेत आला आहे. बिग बॉसमध्ये अनुश्री मानेने राकेशवर गंभीर आरोप लावला. राकेशने आपल्याला परवानगी नसताना हात धरुन खेचल्याचं अनुश्री म्हणाली.3 / 9या आरोपांमुळे राकेश चांगलाच भडकला कारण इंडस्ट्रीत त्याची जेंटलमन अशी प्रतिमा आहे. राकेशची काहीही चूक नसून इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. 4 / 9राकेशची मोठी बहीण शीतल बापटनेही पोस्ट केली. 'वुमन कार्ड खेळून गैरफायदा घेणाऱ्या महिलांमुळेच इतर महिलांबद्दलही तशीच धारणा होते' असं त्या म्हणाल्या.5 / 9शीतल बापटने याआधी हिंदी बिग बॉसवेळीही भावाला सपोर्ट केला होता. तेव्हा ती चर्चेत आली होती. राकेश दरवर्षी रक्षाबंधन, भाऊबीजेला बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करतो. राकेशची बहीण नक्की काय करते माहितीये का?6 / 9शीतल बापट या पॅरेटिंग कोच आहेत. तसंच त्या करिअर मार्गदर्शकही आहेत. श्यामची आई फाउंडेशनही त्या चालवतात. वन्स अ पॅरेंट या त्यांच्या पेजवर त्या पालकांना मार्गदर्शन करतात.7 / 9शीतल बापट यांना ईशा आणि प्राची या दोन मुली आहेत. त्यातील प्राचीचं लग्न झालं असून ती अमेरिकेत राहते. तर ईशा एखाद्या अभिनेत्रीसारखीच दिसायला सुंदर आहे.8 / 9शीतल बापट यांना ईशा आणि प्राची या दोन मुली आहेत. प्राचीचं लग्न झालं असून ती अमेरिकेत राहते. तर ईशा एखाद्या अभिनेत्रीसारखीच दिसायला सुंदर आहे.9 / 9धाकटी भाची ईशा बापट ही राकेशला भेटायला बिग बॉस हिंदीमध्येही आली होती. ती गेट विल डन या कंपनीत काम करते. सौंदर्यात ती भल्याभल्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.